Monday, October 6, 2014

कविता

आईची माया असतेच खूप न्यारी
मऊ उबदार असं काहीतरी
गंध मायेचा , अन शिडकावा प्रेमाचा
आईच्या मायेत मन घरी न दारी
नसतो ठाव ठिकाणा इथे ,
नसतो लवलेश स्वार्थाचा
आई तूची एकच देव
पालनहार धरतीचा 

देशाचा गरीब सुपुत्र

माझी कविता- देशाचा गरीब सुपुत्र 


मीही शिकलो असतो तर
किती चांगलं झालं असत
मीही काहीतरी बनलो असतो
तर किती चांगलं झालं असत
जर एवढी गरिबी नसती आपल्या देशामध्ये
माझ्या सारखा प्रत्येक बालक पोट भरून
जेवला असता , तर किती चांगल झालं असत
माझ्या वयाच्या बालकांना जेव्हा
मनसोक्त खेळताना पाहतो ,
जर मीही मजुरी न करता अस मनसोक्त खेळलो
असतो , तर किती चांगलं झालं असत
आई बाबा जेव्हा माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी
हताशपणे पाहतात एकमेकांकडे ,
तेव्हा मनात विचार येतो मी जन्माला आलो नसतो
तर किती चांगलं झालं असत
जेव्हा आई उपाशी झोपते ,
मला शिळंपाक खाऊ घालून
तेव्हा मनात विचार येतो मी श्रीमंत असतो
तर किती चांगलं झालं असत .


          विवेक शेळके 

आई असते.....

माझी कविता -आई असते..... 


आई असते वृक्ष मायेचा
आई असते छाया
आई निर्मल झरा पाण्याचा
आई असते कोमल काया
आई असते आधार वड
आई असते श्वास
आई असते प्रेमळ आसरा
आई देवाचा वास !!!!!


 @ विवेक शेळके 

सत्य

सत्य


स्वर्ग हवाय सर्वांना
मरणाला कुणी तयार नाही
शांतता हवी सर्वांना
शांतता कुणी पाळत नाही
प्रेम हवंय सर्वांना
प्रेम कुणी देत नाही                                                              
सर्वांना व्हायचंय आनंदी
पण दुसऱ्यांना आनंद द्यावा
असं कुणाला वाटत नाही


@ विवेक शेळके 

बालगीत

बालगीत
                    अगडबम ढगडबम
                      हत्तीबुवा आले
इवलीशी शेपटी त्यांची
डुलू डुलू हाले
लांब लांब कानांचे
ससोबा भारी
लाल लाल गाजर पाहून
 होते खुश स्वारी  
कोल्होबांची कोल्हेकुई
भुईला भार
गोड गोड द्राक्ष
आंबट लागतात फार
हूप हूप माकडोबा
वात्रट भारी
भोळसट प्राण्यांची
काढतात खोडी
ईटू पिटु खारुताई
दुडू दुडू पळे
खायला हवी तिला

गोड गोड फळे  

Sunday, September 7, 2014

Shayari

Apna toh chaahaton mein bas yahi usool hain, Jab tu kubool hai to tera sab kuch kubool hain

Thursday, May 1, 2014

महाराष्ट्र दिनानिमित्त ...

या महाराष्ट्राने मला दिलंय काय
शिवरायांसारखा राजा
अन जिजाऊ सारखी माय

या महाराष्ट्राने मला दिलंय काय
                                               
                                         -विवेक शेळके 

Thursday, April 24, 2014

कविता

कुठवर चालणार असे 
बोट धरून दुसऱ्याचे
आतातरी निवडावयाचे 
मार्ग तू स्वताचे 

      नाही शिकणार जीवनरीत
      वाचून गणित शास्त्र 
      बांधून घे अनुभव गाठीला 
      कामी येईल हेची अस्त्र 

पोळतील तुझे पाय जेव्हा 
जीवन धडा शिकशील खरा 
घेई दुख जाणून जणांचे 
जीवन शिक्षणाचा खेळ सारा 

       ओळखाया लागशील जेव्हा 
        मन दुसऱ्याचे अजाण
       जीवनाचे कोडे थोडे 
       उलगडेल हे जाण

                                - विवेक शेळके 

Tuesday, April 22, 2014

'अर्थ ' डे च्या निमित्ताने .....

कुणी म्हणतंय आई तुला 
कुणी म्हणतंय धरणी माय
तुझ्या विना कुणालाही 
आसरा इथे मिळत नाय 

तुझ्याच उदरातून जन्मले सारे 
तूच केलास माय सांभाळ 
पण बघतेस न आई तुझी 
आज  कशी होतेय आबाळ

उदरावर ज्यांना वाढवलस तू 
त्यांनीच तुझ्यावर घातला घाव
शोधतोय म्हणे नवीन रहस्ये 
साजुकतेचा आणत आव 

कशी करतेस सहन तू 
झेलतेस तू निर्दय घाव 
होतेय कत्तल तुझ्या निसर्गाची
विकासाचं घेऊन नाव 

उघड्या डोळ्यांनी पाहतेस तू
अशीच मनमानी चालणार काय 
या भाबड्याना कळत का नाही 
तुझ्याविना कुणी राहणार नाय 

                              - विवेक शेळके

Tuesday, April 15, 2014

हे युवका...

कशासाठी हे जगणे असले
निरर्थक अन लाचारीचे
कशासाठी जोखड वाहावे
आजन्म गुलामगिरीचे

हो स्वतंत्र अन घे भरारी
उभा कर डोलारा
हे युवका तूच आहेस
तुझा मालक खरा

शोध घे तू नव्याचा
नकोच जुन्या वाटा
जरी काटे असंख्य रुतती
मागे वळू नको आता

संधी अनंत येती तुजला
सोन करण तुझ्या हाती
उभा ठाक एकटा निश्चल
आशीर्वाद तुझ्या पाठी .

                         - विवेक शेळके  

" दे रोजगार "

घेतलं शिक्षण बांधलं गाठी
कौशल्याची शिदोरी पाठी
रोजगार मी शोधीत फिरतोय
फिरतोय मी दारोदार
दे रोजगार  दे रोजगार
आहे भरोसा क्षमतेवर  पण
नशीब खातय माती
बिनकामाचे रुजू होती
' लायकच' भरडले जाती
लायकी आमची सिध्द करू
सिद्ध करू हो वारंवार
फिरतोय मी बेकार देवा
दे रोजगार दे रोजगार
नोकरी मागतोय शिक्षणावर
मग वशिला कशासाठी
घाम गाळुनी किमत मोजू
चिरीमिरी का देऊ हाती
मेहनत करुनी जगा दाखवू
उभा करू सहकार
हात जोडूनी विनंती देवा
दे रोजगार दे रोजगार

                         -विवेक शेळके 

प्रारब्ध

माझं मन तुला कसं कळणार
हृदयाच्या जखमा खोलवर
कोरड्या मनाने कशा दिसणार
विचारच केला नाहीस कधी माझा
मग परकाच ना भासणार
माझ्या डोळ्यातील शुष्क अश्रू
तुला कसे ग दिसणार
प्रारब्धच आहे माझे
तुझ्याविना जगण्याचे
नशीबच, ते कसं बदलणार

                     - विवेक शेळके 

जेव्हा दिसतेस तू

जेव्हा दिसतेस तू
काहूर माजतय मनी 
विणलेल्या सर्व स्वप्नांचं
होतंय ग पाणी पाणी 

जेव्हा दिसतेस तू 
मन वेडावत माझं 
आनंदाच्या क्षणालाही 
तुझ्या विरहाचा साज 

जेव्हा दिसतेस तू 
मन कशातच रमत नाही 
कितीही ठरवलं तरी 
दुख पचवायला जमत नाही 

जेव्हा दिसतेस तू 
मन मलाच सांगत राही 
तुझ्याविना जगणे हे 
जगणेच नाही 

जेव्हा दिसतेस तू 
जीव थरथरत राही 
तुझ्या आठवणींचा झरा 
माझ्या डोळ्यांतून वाही

                       -विवेक शेळके 

Sunday, April 13, 2014

तुझे आहे तुझपाशी

तुझे आहे तुझपाशी
शोधिशी कारे अकारण
नाही अन्यत्र भेटणार
शोध रे तुझे अंतकरण
वेळ दवडशी जमवण्यात
वित्त सत्ता संपत्ती
सर्वची आहे तुझपाशी
जमवणार तू किती
जमविलेस त राशी राशी
हिरे माणिक मोती
कवडीमोल हि ठरतात
अनमोल अशी हि नाती
अनमोल संपत्ती मानवतेची
विसरलास तू कशी
शोधिशी कारे आकारण
तुझे आहे तुझपाशी

                             - विवेक शेळके  

Saturday, April 12, 2014

वोट के लिये नोट


               वोट के लिये नोट

निवडणुका जवळ आल्या
तशी सुरु झाली लगीनघाई
मतांच्या मागणीसाठी
उमेदवारांची शिष्टाई

मीच तुमचा नेता शोभतो
सगळेच पटवून द्यायला लागतात
सत्ता भोगून काम न करणारेही
पुन्हा पुन्हा मत मागतात

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
दोन्ही बाजूंनी झाडल्या जातात
उमेदवार राहतात ‘ सेफ ’
कार्यकर्त्यांची डोकी फुटतात

इतकं सगळ करुनही कळत
हाती काहीच लागणार नाही
हात जोडून मतदात्यांना
आता काही भागणार नाही

सत्ता मिळवण्यासाठी
मनात नीतिमत्तेची खोट
मग सुरु होतो तोच खेळ
“ वोट के लिये नोट “

                         - विवेक शेळके  

Monday, February 17, 2014

जीवनगाणे

अंतरंगी खोल मनात भाव मजला दिसे
हृदयी इथे प्रत्येकाच्या जीवनगाणे वसे
         अज्ञानाची पुसून पाटी
         ज्ञान रेखिले भाली
          मनामनात नात्यांची
          समृद्धी आज हि आली
नवी ध्येये क्षितीजावरती दिसे
हृदयी इथे प्रत्येकाच्या जीवनगाणे वसे
          धागाधागा गुंफून इथे
          विणतो आपण नाती
          उजलवितो मने सारी
          पेटवून जीवन ज्योती
जीवन सुंदर बनवणे मनात इथे ठसे
हृदयी इथे प्रत्येकाच्या जीवनगाणे वसे

                                      -विवेक शेळके 

बालगीत

एक होती मनीमाऊ
गोरी गोरी पान
रोज उठून करायची
दुधाने स्नान
पाव भाजी बिस्कीट
आवडती खारी
किचनची मालकीण
तीच हो खरी
खाऊन खाऊन फुगली
झाली गलेलठ्ठ
उंदीर पकडण्यात
आहे भारी मठ्ठ
एकच जागी पडून
खात असते नुसती
मिची मिची डोळ्यांवर
दिवसभर सुस्ती

                      - विवेक शेळके 

सत्य

सत्याची वाट
काटे घनदाट
सोडू नको पाठ
कास धरी
         मोहाचे क्षण
         पदोपदी येती
         डगमगू नको
         अचल राही
सत्ता संपत्ती
गरजे पुरती
जतन करावी
नाती रक्ताची
         फळ कष्टाचे
         अवीट चवीचे
         मिळेल तो मान
         जनामध्ये

                                  -विवेक शेळके 

संधी

साधा संधी
     पिकवा सोन
मेहनतीच चीज करा
     आळस झटका
घाम गाळा
     पुन्हा नव्याची
कास धरा
     व्यर्थ बडबड
करू नका
     वाट वाकडी
धरू नका
      स्तुती नाही
केलीत तरी
       निंदा कुणाची
करू नका
                 
                    - विवेक शेळके
   

बडबडगीत

दूर दूर आकाशात
बाप्पांची शाळा
शाळेच्या पटांगणात सारे
बाप्पा झाले गोळा
बाप्पांनी लावल्या  तिथे
भली मोठी रांगा
सरांना म्हणे आता
शिकवायला सांगा
मुळाक्षरे आता आम्ही
शिकलोय बघा सारी
इंग्रजी बोलायला कसं
वाटतय लय भारी
गृहपाठ नको आज
खाऊ आईस गोळा
देवभक्ती गीत झालं
सुटली बाप्पांची शाळा .

                      -विवेक शेळके

शिल्पकार

तूच आहेस शिल्पकार
तुझ्या जीवनाचा
अंतरंगी ठाव घेरे मानवा
तूच तूझ्या मनाचा
जन्म मरणाचे चक्र हे
नाही कधी थांबणार
कर्म असे करावे जे
पुसले कधी न जाणार
कनक ,कांता,सत्ता ,संपत्ती
नाही हे यशस्वी जीवन
कर सर्वाना सुखी समाधानी
अर्पून तुझे तन मन
कुणास ठावूक भेटेल काय
पुन्हा जीवन मानवाचे
मग काय कारण असे
हे पशुतुल्य जगण्याचे
सामर्थ्य आहे तुझ्यात
नवा बदल घडवण्याचा
तूच आहेस शिल्पकार
तुझ्या जीवनाचा

                         - विवेक शेळके 

असं आयुष्य जगावं

काही क्षणाचं का होईना
असं आयुष्य जगावं
फुलपाखरासारख स्वच्छंदी
उन पावसासारख असाव
चिखलातील कमळासारख उमलाव
पाण्यासारख खळखळाव
सुख दुखातून जाताना
नव्या पालाविवानी बहराव
असं आयुष्य जगावं
काही क्षणाचं का होईना
पण अजरामर व्हावं
फुल होऊन सुगंध द्यावं
चंदनापरी अखंड झिजाव
परीस बनून दुर्बलांना
प्रगतीपथावर न्याव
काही क्षणाचं का होईना
पण असं  आयुष्य जगावं

                             - विवेक शेळके  

Saturday, February 15, 2014

तुमच्यासाठी .......

तू आलीस अन तू पाहिलं
त्याच क्षणी माझं
काळीज मी तुला वाहिलं
थंडगार पाण्याचा पेला
जेव्हा तू पुढे केलास
तेव्हाच तुझा हात हाती दिलास
मी पुरता बेभान झालो
तुझ्या खळाळून हसण्याने
शुध्द तेवढी हरपायची राहिली होती
तुझ्या जवळ बसण्याने
तुझ्याकडे चोरून बघताना
अंगावर शहारे यायचे
पण तुझी नजर माझ्याकडेच कळल्यावर
मन मात्र प्रफुल्लीत व्हायचे
आपल्या त्या पहिल्या भांडणाने
मनात काहूर माजलं होत
उगाच भांडलो हे कळल्यावर
मन आपसूकच लाजल होत
तू म्हणायचीस पाहिल्यावर मला
गच्च मिठी मारावीशी वाटते
खर सांगू तुला
मला मात्र तेव्हा तुझी भीती वाटते
आज माझी नाहीस तू
पण माझीच आहेस सांगतय मन
प्राणही माझे मागितलेस तरी
तुमच्यासाठी कायपण.....


                                -  विवेक शेळके 

असा युवा घडावा

असा युवा घडावा
या भारतभूमी मध्ये
शिवबासम बुद्धी
अन जोर मनगटामध्ये
अन्यायास मोडून काढील
नष्ट करील मनमानी
असा युवा घडावा
माझ्या संभाजी राजावाणी
गोर गरीबा करील साह्य
दुख दूर करील दलितांचे
मुसक्या बांधील सैतानाच्या
रक्षण करील तो धर्माचे
असा युवा घडावा
ज्यावर देश करील अभिमान
मातृभूमीच्या समृद्धीसाठी
वाहील जो पंचप्राण

                             -विवेक शेळके 

स्वप्नातला संसार

तुझा माझा स्वप्नातला संसार
स्वप्नवत फुलत होता
आशा आकांक्षांच्या पारंब्यावर
मनसोक्त झुलत होता
एके दिवशी मला म्हणालीस
पुरे झाल कारे खेळण
स्वप्नातल्या संसारात
असं स्वप्नवत झुलन
त्याच क्षणी मी भानावर आलो
वास्तवाची जाणीव झाली
सोडून गेलीस मला जेव्हा
माझ्या आयुष्यातच उणीव आली

                                         - विवेक शेळके 

शिवबा

इस तरह तलवार चलाई
पौलादी सीनेसे
हिल गये सब दुश्मन
शिवबा क आनेसे
जात-पात ना वो जाणता
मानवता को धर्म मानता
सत्य की राह्पे  चला है
मा जिजाऊ का बेटा
मुठ्ठीभर जवानोसंग
भीड गया वो लाखोसे
नींद भी चुराई उसने
शैतानोके अंखोसे
वो है शेर मर्द मराठा
चलो झुककर करे सलाम
गर्व से कहो हम हिंदू है
लेके शिवबा का नाम
       
                           - विवेक शेळके  

नाती

नाही इथं कुणी आपलं
मग आपण इथं  कुणाचे
सखे सोबती आपण सारे
फक्त काही क्षणांचे
एकोप्याने राहू म्हणता
चुगली कुणी करावी
अखंड नात्यांमध्ये सुद्धा
फुट अशी पडावी
सूत्रधार इथे कुणीच नसतो
सगळे सारखेच दोषी
रस्सीखेच ती चालूच राहील
 नाती टिकणार ती कशी

               - विवेक शेळके 

नात

अबोल मनान बसलेलं
अज्ञात विश्वात वसलेलं
असं तुझ माझं एक नात
अस्तित्वात असूनही नसलेले

कविता

खर काय खोट काय
काहीच कळत नाही
हक्काच जे आहे
ते कधीच मिळत नाही
मांडलाय बाजार इथे
भाव भावनांचा
हिशेब द्यावा लागतो कसा
मोकळ्या मनांचा
तापलेल्या नात्यांवर भाजताहेत
परकीयांचे मांडे
आपापसातील भांडणात
स्वकीयांचेच रक्त सांडे

                                विवेक शेळके 

मैत्री

मैत्री म्हणजे कधीही न कोमेजणारे फुल
खोटेपणाच्या प्रेमापेक्षा खरीखुरी झूल
मैत्री म्हणजे दोन जीव एक मन
निरपेक्षपणे सोबत अनुभवलेले असंख्य क्षण
मैत्रीमध्ये सगळ कसं ऑल इज वेल
मैत्रीपुढे प्रेमबीम सपशेल फेल

                                  - विवेक शेळके