अज्ञात
सलतंय मनात माझ्या
काहीतरी अज्ञात
उलगडत नाही कोडं
गुरफटत चाललोय त्यात
हुरहूर आहे मनात
अन एक अनामिक भीती
होईल सर्व मनासारखं
मनाला समजावू मी किती
सर्व आहे जवळी
पण माझं नाही कोणी
नकोसं होतंय जगणं
या एकांताच्या क्षणी
दाटून येई कंठ माझा
फुटू पाहतो ऊर
मला जायचे आहे
या नश्वरापासून दूर
मला जायचे आहे
या नश्वरापासून दूर
- विवेक शेळके
सलतंय मनात माझ्या
काहीतरी अज्ञात
उलगडत नाही कोडं
गुरफटत चाललोय त्यात
हुरहूर आहे मनात
अन एक अनामिक भीती
होईल सर्व मनासारखं
मनाला समजावू मी किती
सर्व आहे जवळी
पण माझं नाही कोणी
नकोसं होतंय जगणं
या एकांताच्या क्षणी
दाटून येई कंठ माझा
फुटू पाहतो ऊर
मला जायचे आहे
या नश्वरापासून दूर
मला जायचे आहे
या नश्वरापासून दूर
- विवेक शेळके
tasa jar pahaila gela tar aplay saglayanchay manat satat kay na kaytari salat asta agaid satat...aane he mansaik avastha aplayla manatun pokharun takat aste...kalat-nakalat apan tayat halu halu kadhi udhavast wahayla lagto te aplayla kalatpan nahe....pan ayushaychay sandhyakali agadi preteyakala ya "nashwar" jagapasun lamb jaichch aahe yait vaad nahe!
ReplyDelete