एक होती मुंगी
ती नेसून आली लुंगी
तिच्या लुंगीला ठिगळ हाय
मुंगी रड कशी धाय धाय
एक होता मुंगा
तो नेसून आला लेंगा
त्याच्या लेंग्याला नाडीच नाय
मुंगा रडे कसा धाय धाय
एक होता ससा
तो देईन म्हणतो ठोसा
त्याच्या ठोश्यात ताकद नाय
ससा रडे कसा धाय धाय
एक होता हत्ती
त्याच्या अंगात होती मस्ती
मस्ती मुंगीने जिरवली काय
हत्ती रडे कसा धाय धाय
-विवेक शेळके
ती नेसून आली लुंगी
तिच्या लुंगीला ठिगळ हाय
मुंगी रड कशी धाय धाय
एक होता मुंगा
तो नेसून आला लेंगा
त्याच्या लेंग्याला नाडीच नाय
मुंगा रडे कसा धाय धाय
एक होता ससा
तो देईन म्हणतो ठोसा
त्याच्या ठोश्यात ताकद नाय
ससा रडे कसा धाय धाय
एक होता हत्ती
त्याच्या अंगात होती मस्ती
मस्ती मुंगीने जिरवली काय
हत्ती रडे कसा धाय धाय
-विवेक शेळके
No comments:
Post a Comment