कसे फेडावे ऋण आईचे
कळले कुणा न कधी
ना जन्माच्या नंतर
ना जन्माच्या आधी
जिने जपले रात्रदिवस
डोळ्यात घालून तेल
मग सांगा आजारपणात
तिच्या तुम्ही काय हो केलं
भूक लागली अपुल्याला
तिने जेऊ घातलं हाती
ती उपाशी असताना
तुम्ही विचारलं काहो कधी
जुनीच साडी अंगावर पण
नवा कपडा तुला रे दिला
नाही वाटलं का कधी स्वताहून
नवी साडी आणावी तिला
अनंत आहेत ऋण आईचे
फेडणार तू कधी
या जन्मानंतर की
हा जन्म संपण्याआधी
- विवेक शेळके
कळले कुणा न कधी
ना जन्माच्या नंतर
ना जन्माच्या आधी
जिने जपले रात्रदिवस
डोळ्यात घालून तेल
मग सांगा आजारपणात
तिच्या तुम्ही काय हो केलं
भूक लागली अपुल्याला
तिने जेऊ घातलं हाती
ती उपाशी असताना
तुम्ही विचारलं काहो कधी
जुनीच साडी अंगावर पण
नवा कपडा तुला रे दिला
नाही वाटलं का कधी स्वताहून
नवी साडी आणावी तिला
अनंत आहेत ऋण आईचे
फेडणार तू कधी
या जन्मानंतर की
हा जन्म संपण्याआधी
- विवेक शेळके
This comment has been removed by the author.
ReplyDeletesaglayanchaych padrraat jar te "aaiche maya" padle asti tar kitti chaan jhala asta na....!
ReplyDeleteanyway... apratim kavita aahe he! keep it up!