Saturday, February 15, 2014

बंध

तोडून टाकू बंध हे
बंध जाती धर्माचे
एकच सत्य ठसवू मनी
आपण एकाच मातीचे
        कुणी नाही उच्च इथे
        नाही कुणी नीच
कर्माने ठरावे लहान मोठे
खरी वर्गवारी हीच
मानवता हि एकच जात
मानु आपण खरी
अमर राहील मानवधर्म
चंद्र सूर्यापरी

                         -विवेक शेळके    

No comments:

Post a Comment