कशासाठी हे जगणे असले
निरर्थक अन लाचारीचे
कशासाठी जोखड वाहावे
आजन्म गुलामगिरीचे
हो स्वतंत्र अन घे भरारी
उभा कर डोलारा
हे युवका तूच आहेस
तुझा मालक खरा
शोध घे तू नव्याचा
नकोच जुन्या वाटा
जरी काटे असंख्य रुतती
मागे वळू नको आता
संधी अनंत येती तुजला
सोन करण तुझ्या हाती
उभा ठाक एकटा निश्चल
आशीर्वाद तुझ्या पाठी .
- विवेक शेळके
निरर्थक अन लाचारीचे
कशासाठी जोखड वाहावे
आजन्म गुलामगिरीचे
हो स्वतंत्र अन घे भरारी
उभा कर डोलारा
हे युवका तूच आहेस
तुझा मालक खरा
शोध घे तू नव्याचा
नकोच जुन्या वाटा
जरी काटे असंख्य रुतती
मागे वळू नको आता
संधी अनंत येती तुजला
सोन करण तुझ्या हाती
उभा ठाक एकटा निश्चल
आशीर्वाद तुझ्या पाठी .
- विवेक शेळके
No comments:
Post a Comment