घेतलं शिक्षण बांधलं गाठी
कौशल्याची शिदोरी पाठी
रोजगार मी शोधीत फिरतोय
फिरतोय मी दारोदार
दे रोजगार दे रोजगार
आहे भरोसा क्षमतेवर पण
नशीब खातय माती
बिनकामाचे रुजू होती
' लायकच' भरडले जाती
लायकी आमची सिध्द करू
सिद्ध करू हो वारंवार
फिरतोय मी बेकार देवा
दे रोजगार दे रोजगार
नोकरी मागतोय शिक्षणावर
मग वशिला कशासाठी
घाम गाळुनी किमत मोजू
चिरीमिरी का देऊ हाती
मेहनत करुनी जगा दाखवू
उभा करू सहकार
हात जोडूनी विनंती देवा
दे रोजगार दे रोजगार
-विवेक शेळके
कौशल्याची शिदोरी पाठी
रोजगार मी शोधीत फिरतोय
फिरतोय मी दारोदार
दे रोजगार दे रोजगार
आहे भरोसा क्षमतेवर पण
नशीब खातय माती
बिनकामाचे रुजू होती
' लायकच' भरडले जाती
लायकी आमची सिध्द करू
सिद्ध करू हो वारंवार
फिरतोय मी बेकार देवा
दे रोजगार दे रोजगार
नोकरी मागतोय शिक्षणावर
मग वशिला कशासाठी
घाम गाळुनी किमत मोजू
चिरीमिरी का देऊ हाती
मेहनत करुनी जगा दाखवू
उभा करू सहकार
हात जोडूनी विनंती देवा
दे रोजगार दे रोजगार
-विवेक शेळके
No comments:
Post a Comment